-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असताना काँग्रेसला लागलेली गळतीही वाढत आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)
-
ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंघ याने ३ एप्रिल रोजी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)
-
तर काल ४ एप्रिलला, बहुचर्चित काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)
-
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये गौरव वल्लभ यांनी पक्षप्रवेश केला आहे. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)
-
काँग्रेसमध्ये असताना केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करणाऱ्या वल्लभ यांनी, ‘भाजपाच्या सगळ्याच धोरणांवर मी टीका केलेली नाही’ असे भाजपा प्रवेशानंतर म्हटले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)
-
भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांना पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न? टिव्ही चर्चेत विचारणारे काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ आता भाजपावासी झाले आहेत. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)
-
दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण वल्लभ यांनी सांगितले आहे. आपल्या राजीनामापत्रात “पक्षातील नेत्यांचा तळागाळातील लोकांशी संपर्क नाही, पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय नाही. कार्यकर्ता नेत्याला सूचनाही करू शकत नसेल तर सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा?” असे म्हटले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)
-
सनातन धर्म आणि राम मंदिर या दोन्ही मुद्द्यावरून वल्लभ यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद झाले असल्याचे त्यांच्या राजीनामापत्रातून सांगितले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा