-
पंजाबराव डख हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात येणाऱ्या गुगळी धामणगावचे रहिवासी आहेत. त्यांचा हवामान बदलाचा अंदाज अनेकदा खरा ठरतो, म्हणून जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकरी वर्गात पंजाबराव डख चर्चेत असतात. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
१९९९ पासून पंजाबराव निसर्गाच्या वर्षानुवर्षे मिळणाऱ्या इशाऱ्यावरून आपला अंदाज व्यक्त करतात. त्यांनी हवामान अंदाज सांगण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. असे असले तरीही ते अचूक अंदाज सांगतात, असे शेतकरी सांगतात. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
पंजाबराव डख अलीकडच्या काळात, हवामान बदलाचा अंदाज व्यक्त करणारे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत असतात. यामुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
शेतकऱ्यांमध्ये कमालीचे प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख हवामान अंदाज देताना कधी-कधी चुकतात देखील, तेव्हा त्यांना काही प्रमाणात लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डख यांना परभणीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांनी ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
मी निवडणुकीत विजयी होईल असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण सांगताना डख म्हणाले “मी वंचितचे मतदान मिळवणारच आहे. सोबतच एमआयएमच्या नेत्यांशी बोलून मला पाठिंबा द्यावा असे सांगणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही मी भेटणार आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांचा आवाज म्हणून लोकसभेत जाण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आहे आणि मी निवडून येईल.” (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
दरम्यान, परभणीत आता तिरंगी लढत होताना दिसत आहे. वंचितने बाबासाहेब उगले यांची उमेदवारी रद्द करून पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
महायुतीने परभणीत ओबीसी मतदानाचा विचार करून रासप नेते महादेव जानकर यांना तिकीट दिले. तर शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार असलेले संजय जाधव हेच पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढणार आहेत. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)
-
त्यामुळे परभणीमधील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? हे आता ४ जूनला, निकालानंतरच स्पष्ट होईल. (फोटो साभार- पंजाबराव डख – panjabrao dakh/Facebook Page)

हनुमान जयंतीनंतर ४ ग्रहांची होणार महायुती; ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा