-
लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये उमेदवारी मिळेल की नाही या प्रश्नामुळे अस्वस्थता दिसून येतेय. त्यामुळे नेतेमंडळी पक्षबदल करताना दिसत आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. भाजपामध्ये असलेल्या अर्चना पाटील यांनी धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी, ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. (फोटो साभार- Archana Ranajagjitsinha Patil/Facebook Page)
-
संयुक्त शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, २६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिरूरमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे. (फोटो साभार-Shivajirao Adhalrao Patil/Facebook Page)
-
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात पुन्हा प्रवेश केला आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. (फोटो साभार- Nilesh Lanke/Facebook Page)
-
भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हे अजून समजलेले नसले तरी, भाजपाने त्यांना जळगावमधील उमेदवारी नाकारलेली असल्यामुळे, शिवसेनेकडून (उबाठा गट) त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (फोटो साभार-Unmesh Patil – उन्मेश पाटील/Facebook Page)
-
दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश करून सांगली मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे. उमेदवार यादी जाहीर होण्याआधी, स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा एका सभेत केली होती. (फोटो साभार- Chandrahar Patil – पै.चंद्रहार पाटील/Facebook Page)
-
पुणे येथील मनसेचे फायरब्रँड नेते आणि राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी १२ मार्च रोजी पक्षाला राजीनामा दिला. वसंत मोरे अपक्ष लढणार असं वाटत असताना, वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांनी काल ५ एप्रिल रोजी वंचितमध्ये रीतसर पक्षप्रवेश केला आहे. (फोटो साभार- Vasant More/Facebook Page)
-
काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी २४ मार्च रोजी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. रामटेक मतदारसंघातून त्यांना शिंदे गटाने लोकसभा उमेदवारी दिली आहे. (फोटो साभार-Rajubhau Parwe/Facebook Page)
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे संजोग वाघेरे पाटील यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी शिवसेना (उबाठा गट) पक्षात प्रवेश केला आहे. मावळ मतदारसंघातून ते लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. (फोटो साभार-Sanjog Waghere Patil /Facebook Page)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार