-
नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत कोणाला मिळणार? आणि महाविकास आघाडीत कोणाला मिळणार? याचा तिढा सुरू असताना शिवसेना शिंदे गटाने उबाठा गटाला धक्का दिला आहे. (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
माजी मंत्री आणि ५ वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बबनराव घोलप तसेच माजी आमदार संजय पवार, आरपीआयचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात काल ६ एप्रिल रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
शिवसेना उबाठा गट सोडण्यामागचे कारण सांगताना बबनराव घोलप म्हणाले “पीए मिलिंद नार्वेकर यांचं ऐकून मला पक्षातून बाहेर काढलं. मिलिंद नार्वेकर कोण आहेत? मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवला. मात्र मिलिंद नार्वेकर यांचे ऐकून मला अचानकपणे बाजूला करण्यात आले.” (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
…तर, मी एकनाथ शिंदेचीही साथ सोडेल! एकनाथ शिंदेबद्दल बोलताना घोलप म्हणाले “एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि वारसा पुढे घेऊन जात आहेत. यापुढे मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे. जर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तर मी त्यांनाही सोडेल” (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोलप यांचे स्वागत करताना म्हणाले की “बबनराव घोलप यांनी आम्हाला तिकडचे अनुभव सांगितले आहेत. आमचेही अनुभव तसेच काहीसे होते. आता त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर निष्ठा दाखवून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे” (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
पुढे बोलताना शिंदे म्हणाले “घोलप यांनी स्वतःसाठी काहीही न मागता, त्यांच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली. घोलप यांनी याआधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. पण उशिरा का होईना, त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.” (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना उबाठा गटावर निशाणा साधला आहे. “बबनराव घोलप आमच्याकडे आल्यामुळे उद्यापासून त्यांना कचरा असे संबोधले जाईल. त्यांना गद्दार म्हटले जाईल” (फोटो साभार-Eknath Shinde-एकनाथ संभाजी शिंदे /Facebook Page)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा