-
अमरावती लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला.
-
अमरावती येथे राणा दाम्पत्यांनी उभ्या केलेल्या गुढीला विजयाची गुढी असे नाव दिले. भाजपातून निवडणूक लढवत असल्यामुळे नवनीत राणा चांगल्याच उत्साहात आहेत.
-
नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपले पती आमदार रवी राणा यांच्यासह जोरदार प्रचार सुरू केला आहे.
-
बीड लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनीही आज गुढी उभारून प्रचार केला.
-
गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या शिरूर कासार तालुक्यातील धनगरवाडी गावात पंकजा मुंडे यांनी गुढीपाडवा सण साजरा केला.
-
बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही कुटुंबियासह गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सासू, मुलगा पार्थ आणि यश उपस्थित होते.
-
यावेळी पार्थ पवार आणि अजित पवार यांनी स्वतः गुढी उभी करून कौटुंबिक वातावरणात सण साजरा केला.
-
सुनेत्रा पवार यांच्या विरोधक सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमधील गोविंदबागेत गुढी उभारली. नणंद-भावजय एकमेकींच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
-
सुप्रिया सुळे यांच्यासह पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळेही उपस्थित होत्या.
-
यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे.
-
राजश्री पाटील यांनी यवतमाळमधील आपल्या माहेरी गुढी उभी केली. तसेच प्रचाराची सुरुवात केली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”