-
लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या काही उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत, तर काही पक्षांच्या याद्यांची अजूनही प्रतिक्षा आहे. महायुतीत काही जागांवरील तिढा कायम आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे.
(Express photo by Sankhadeep Banerjee) -
काल ९ एप्रिल रोजी मात्र मविआचे जागावाटप पूर्ण झाले आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांनी काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी- (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उध्दव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
महाविकास आघाडीने या संयुक्त पत्रकार परिषदेत सर्व तीन घटक पक्षांमधील जागावाटप पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
या जागावाटपानुसार शिवसेना (उबाठा) पक्षाला २१ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळाल्या आहेत.
-
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष १७ जागांवर लढणार असल्याचे या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
-
शरद पवारांचा राष्ट्रवादी- (शरदचंद्र पवार) पक्ष हा १० जागांवर लढणार आहे.
-
गेला महिनाभर महाविकास आघाडीत चाललेला जागावाटपाचा पेच अखेर संपला, परंतु महायुतीतील पेच अजूनही कायम आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये मात्र जागावाटपावर अद्याप संभ्रम आहे. महायुतीचे जागावाटप कधी होणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढत कशी असेल? आणि कोण बाजी मारेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”