-
महाराष्ट्रातील मराठवाड्यात असलेल्या जालना मतदारसंघाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरेल अशी शक्यता आहे. जालना लोकसभा जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. (Photo Source- Raosaheb Danve/Facebook Page)
-
मविआने ही जागा काँग्रेस पक्षाला दिली आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळेल अशी शक्यताही होती. तशी काँग्रेसची मागणीही होती. (Photo Source- Dr.Kalyan Kale/Facebook Page)
-
महायुतीमध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे यांनाच उमेदवारी मिळणार हे गेल्या अनेक महिन्यांपासून निश्चित होते. (Photo Source- Raosaheb Danve/Facebook Page)
-
काँग्रेसमध्ये कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा होती. माजी आमदार काळे यांनी २००९ मध्ये दानवे यांना जोरदार लढत दिली होती. (Photo Source- Dr.Kalyan Kale/Facebook Page)
-
महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना टक्कर देणार आहेत. (Photo Source- Dr.Kalyan Kale/Facebook Page)
-
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधातील रोष काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी उभा राहू शकतो, असा कयास बांधून उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली होती. (Photo Source- Raosaheb Danve/Facebook Page)
-
मागील सलग सात निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय झालेला आहे. त्यापैकी सलग पाच निवडणुकांत भाजपाचे रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. (Photo Source- Raosaheb Danve/Facebook Page)
-
काँग्रेस पक्ष या मतदारसंघातून सलग सात वेळेस पराभूत झालेला असून भाजपाचा विजय झालेला आहे. सलग सात वेळेस पराभव झाला असला तरी, महाविकास आघाडीत बदलत्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याने काँग्रेसच्या आशा उंचावल्या आहे. (Photo Source- Dr.Kalyan Kale/Facebook Page)
-
यावेळेला काँग्रेसला यश मिळणार की पुन्हा भाजपाचे रावसाहेब दानवे बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?