-
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १० एप्रिल रोजी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याचे भाजपाने टाळले आहे. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)
-
या यादीतही भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना संधी न देऊन धक्का दिला आहे. (Photo Source- Virendra Singh/Facebook Page)
-
ज्येष्ठ अभिनेत्री व चंडीगडमधील भाजपाच्या खासदार किरण खेर यांना यावेळेस संधी दिली नाही. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)
-
भाजपाच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशातील बलियाचे खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनाही वगळण्यात आले आहे. (Photo Source- Virendra Singh/Facebook Page)
-
या दोन्ही नेत्यांनी सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)
-
चंडीगडमधून किरण खेर यांनी २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पवन बन्सल यांचा पराभव केला होता. पण, त्यांना भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारली असून, माजी प्रदेशाध्यक्ष संजय टंडन यांना संधी दिली आहे. (Photo Source- Sanjay Tandon/Facebook Page)
-
काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या प्रयागराजच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांनाही पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. (Photo Source- Prof. Rita Bahuguna Joshi/Facebook Page)
-
प्रयागराजमधून सलग दुसऱ्यांदा रिटा बहुगुणा-जोशी यांना संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या बहुगुणा २०१७ मध्ये विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. (Photo Source- Prof. Rita Bahuguna Joshi/Facebook Page)
-
दरम्यान देशात १९ एप्रिल ते १ जून अशा एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल लागणार आहे. (Photo Source- Kirron Kher/Facebook Page)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई