-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
-
“लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
-
त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानल्याचे पहायला मिळाले तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
-
अशातच आता राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे, असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
-
कीर्तिकुमार शिंदेंपाठोपाठ डोंबिवलीतही मनसेला धक्का बसला आहे. डोंबिवलीमधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षाला रामराम केला आहे.
-
राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
-
राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा देत आहे असं मिहिर दवते यांनी म्हटलं आहे.
-
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर एकीकडे काही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
मनसेचा प्रवास- २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. २०१२ मध्ये नाशिक महापालिकेची सत्ता मिळाली होती. २०१९ मध्ये राज यांनी मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. नंतरच्या निवडणुकांमध्ये मनसेची पीछेहाट झाल्याचे पहायला मिळाले. २०१४ आणि २०१९ मध्ये मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला.

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण