-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसऱ्या यादीत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
माथाडी कामगारांच्या लढ्यासाठी परिचित असलेले शशिकांत शिंदे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
१९९९ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. जावळीतून आमदार झालेले शिंदे हे पुढे मंत्रीही झाले. त्यांनी जलसंपदामंत्री म्हणून काम केले. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ या काळात १० वर्ष आमदार. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
तसेच, राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
शशिकांत शिंदेंनी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून, जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पक्षाचा जनता दरबार घेण्यास सुरुवात केली. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
दरम्यान, महविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे विरोधात महायुती कोणाला उतरवणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page

अखेर गोविंदाने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन, म्हणाला, “मी माझे…”