-
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. (Photo Source- Shrimant Shahu Maharaj Chhatrapati/Facebook Page)
-
मंडलिक यांनी दोन दिवसांपूर्वी, “आताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आणि ही कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहे,” असे विधान केले आहे. या विधानावरून आता वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
या विधानानंतर चर्चेत आलेले संजय मंडलिक कोण आहेत, जाणून घेऊयात (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे १९७२ साली पहिल्यांदा आमदार बनले. १९९३ साली पाटबंधारे, शिक्षण या खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार त्यांच्याकडे होता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले. सलग तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेवर निवडून गेले.
-
सदाशिवराव मंडलिक आणि विजयमाला मंडलिक या दाम्पत्याच्या घरी कोल्हापूरमध्ये १३ एप्रिल १९६४ रोजी संजय मंडलिक यांचा जन्म झाला. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
संजय मंडलिक हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांच्याकडून त्यांचा ३३ हजार २५९ मतांनी पराभव झाला होता. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
२०१९ च्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक विजयी झाले. त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
-
कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक पुन्हा एकदा निवडणुकीत उभे आहेत. त्यांना महायुतीने शाहू महाराजांच्या विरुद्ध उमेदवारी दिली आहे. शाहू महाराज महविकास आघाडीचे उमेदवार आहेत. (Photo Source- Sanjay Mandlik/Facebook Page)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य