-
सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. विविध मतदारसंघात पक्षांचे नेते आणि उमेदवार प्रचाराचे काम करत आहेत.
-
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा काल (११ एप्रिल) पार पडली.
-
प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा नारा दिला. “जनतेने स्थिर सरकारचे फायदे पाहिले आहेत. आमच्या सरकारच्या नेतृत्वाखाली सैन्य दल दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा करत आहेत,” असे मोदी म्हणाले.
-
“भाजपा सरकारने भ्रष्टाचाऱ्यांना देशाची लूट होण्यापासून रोखले. भूतकाळातील कमकुवत काँग्रेस सरकार सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करू शकले नाही. आता सीमेवर रस्ते आणि आधुनिक बोगदे बांधले जात आहेत,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
-
काँग्रेसने प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आणि अयोध्या मंदिराच्या बांधकामाला विरोध केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
-
“त्यासाठी काँग्रेसला माफ करण्यात आले आणि अयोध्या मंदिरातील अभिषेक समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले, परंतु त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला,” असेही ते म्हणाले.
-
“विकसित भारत ही संकल्पना पूर्ण करणार असून ज्यामध्ये विकसित उत्तराखंड महत्त्वपूर्ण भाग आहे. पण काँग्रेस सरकारमध्ये मध्यस्थांमुळे सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. मात्र भाजपा सरकारच्या काळात योजनांचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत त्यांच्या बँक खात्यातून पोहोचत आहे” असे पंतप्रधानांनी सांगितले.
-
“ऋषिकेशमध्ये अभूतपूर्व पर्यटन क्षमता आहे. साहसी आणि आध्यात्मिक पर्यटनाचा हा अनोखा संगम आहे,” असेही ते म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सुरू असलेल्या मेगा रोड, रेल्वे आणि हवाई पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची माहिती दिली आणि ते म्हणाले की ते राज्यातील पर्यटनाला चालना देतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण करतील.
-
(सर्व फोटो साभार- BJP Uttarakhand/Facebook Page)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा