-
देशात १८व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. काही दिवसांतच प्रत्यक्ष मतदानाही सुरुवात होईल. मात्र, देशात पहिली निवडणूक कधी झाली? तुम्हाला माहिती का? चला भारतातील पहिल्या निवडणुकीची काही क्षणचित्रे आणि या रंजक माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
देशात पहिली निवडणूक पार पडली, ती १९५१-५२ या वर्षांत. पहिल्या निवडणुकीबरोबर भारत जगात लोकशाही देश म्हणून उदयास आला. या निवडणुकीने देशातील आगामी निवडणुकीचा पायाही रोवला. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
देशातील पहिली निवडणूक २५ ऑक्टोबर १९५१ रोजी सुरू झाली आणि जवळपास चार महिने चालली. पहिल्या निवडणुकीत २१ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार देण्यात आला होता. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
देशभरात यावेळी एकूण १ लाख ९६ हजार ०८४ मतदान केंद्रावर मतदान उभारण्यात आली होती. यापैकी २५ हजार ५२७ मतदान केंद्रे महिलांसाठी आरक्षित होती. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
या निवडणुकीसाठी ३.३८ लाख पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. तसेच ५ ऑगस्ट १९५१ रोजी उदयपूरमध्ये निवडणुकीची पहिली ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आली होती. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
या निवडणुकीत एकूण १८७४ उमेदवार उभे होते. ज्यापैकी ५२४ अपक्ष उमेदवार होते. विशेष म्हणजे या निवडणुकीदरम्यान ३९७ वृत्तपत्रे सुरू करण्यात झाली. मात्र, अर्ध्यापेक्षा जास्त वृत्तपत्रे निवडणूक संपेपर्यंत बंद पडली. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
अभिमानाची बाब म्हणजे, त्यावेळी निवडणुकीचा अनुभव ना सरकारला होता, ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही जनतेला, याशिवाय आणखी एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे देशातील निरक्षरता. त्यामुळे भारतात निवडणुका कशा प्रकारे पार पडतील, अशी चर्चा जगभरात सुरु होती. मात्र, अनेक अचडणींचा सामना करत भारताने देशातली पहिली निवडणूक यशस्वीपणे पार पडली. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
या निडवणुकीत २१ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या तब्बल १७६ दशलक्ष मतदारांनी या मतदान केले होते. यापैकी तब्बल ८२ टक्के लोक हे निरक्षर होते. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
टक्केवारीचा विचार केला, तर या निवडणुकीत एकूण ५१.५५ टक्के मतदान झाले होते. संपूर्ण देशातील १७.३२ कोटी मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील ४५ टक्के महिला होत्या. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
अर्थातच, स्वातंत्र्यासाठी लढलेला एक मोठा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस निवडणुकीच्या या रिंगणात प्रबळ दावेदार होता. मात्र, इतरही अनेक विचारधारांचे पक्ष या राजकीय आखाड्यात उतरले होते. यामध्ये समाजवादी पक्ष, किसान मजदूर प्रजा पक्ष, अखिल भारतीय जन संघ, हिंदू महासभा, अखिल भारतीय रामराज्य परिषद आणि क्रांतीकारी समाजवादी पक्ष, यांचा समावेश होता. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
२५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक अधिकारी होते. १९ एप्रिल १९५० रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संसदेमध्ये लोकप्रतिनिधीत्वाचा कायदा आणि भारताचा निवडणूक कायदा मांडला आणि जाहीर केले की, १९५१ च्या वसंत ऋतूमध्ये भारतातील निवडणुका होतील. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
मतदानासाठी १९ लाख स्टीलच्या मतपेट्या तयार करण्यासाठी १२ हून अधिक कारखानदारांना कंत्राट देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतपेट्या हिरव्या रंगाच्या चार छटांमध्ये होत्या, तर विधानसभेसाठीच्या मतपेट्या तपकिरी रंगाच्या चार छटांमध्ये होत्या. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
१९५१ मध्ये भारतातील साक्षरतेचा दर हा फक्त १८.३३ टक्के इतका होता. प्रत्येक उमेदवारासाठी एका रंगछटेची मतपेटी ठेवायची अशी ती कल्पना होती. मात्र, ही कल्पना व्यवहार्य ठरली नाही. त्यामुळे मग प्रत्येक उमेदवारासाठी वेगळी मतपेटी ठेवण्यात आली आणि त्यावर त्याचे निवडणुकीचे चिन्ह लावण्यात आले. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
मतपत्रिकेचा आकार एक रुपयाच्या नोटेच्या आकाराएवढा होता, ती गुलाबी रंगाची होती. तिच्यावर ‘भारतीय निवडणूक आयोग’ असे लिहिण्यात आले होते. तिच्यावर राज्यांची नावेही होती. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
१५ महत्त्वाचे म्हणजे लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूकही पार पडली होती. या निवडणुकांत वेगवेगळ्या राज्यातील विधानसभेचे १५,३६१ उमेदवार होते. कोट्टायम (त्रावणकोर-कोचीन), अलेप्पी (त्रावणकोर-कोचीन) आणि गुडीवाडा (मद्रास) या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त म्हणजेच ८०.५ टक्के, ७८.१ टक्के आणि ७७.९ टक्के मतदान झाले होते. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
२ एप्रिल १९५२ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ३१८, समाजवादी पक्षाने १२, किसान मजदूर प्रजा पक्षाने ९, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ८, हिंदू महासभेने ४, अखिल भारतीय रामराज्य परिषद आणि क्रांतिकारी समाजवादी पक्षाने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या; तर ३७ अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
१७ भारतीय निवडणूक आयोगाने १४ पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता दिली होती आणि ५० हून अधिक पक्षांना ‘प्रादेशिक पक्षा’चा दर्जा दिला होता. निवडणुकीनंतर फक्त काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय जनसंघाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवता आला. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )
-
रामचंद्र गुहा यांनी आपल्या पुस्तकात याविषयी लिहिले आहे की, “मानवी इतिहासातील लोकशाहीचा सर्वात मोठा प्रयोग” असे वर्णन भारताचे पहिले निवडणूक अधिकारी सेन यांनी केले आहे. इतकी मोठी प्रक्रिया राबवण्यासंदर्भात पंतप्रधान नेहरूंसह अन्य सहकाऱ्यांना असलेल्या शंकांचे निरसन सुकुमार सेन यांनी केले. (फोटो सौजन्य – निवडणूक आयोग )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”