-
महायुतीला राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत, अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी घेतली.
-
त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
-
यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. “नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटलं” त्यामुळेच मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.
-
“देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेतं फेकण्यात आली. राम मंदिरासाठी चाललेले प्रदीर्घ आंदोलन विसरता येणार नाही. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसतं”, असे राज ठाकरे म्हणाले.
-
मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरवलेलं नाही. मतदान आलं की मैदानं बुक केली जातात. त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना नाही तर नमोनिर्माण सेना आहे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत विचारलं असता आज राज ठाकरेंनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
-
“कावीळ झालेल्या लोकांना जग पिवळं दिसतं ना तशी काही लोकांची परिस्थिती आहे. ते आत्ताच तुरुंगातून बाहेर आले आहेत त्यामुळे त्यांना जे हे वाटतं आहे.” असं म्हणत संजय राऊत यांच्या नमोनिर्माण आणि फाईलच्या आरोपाला राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
-
“भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा, कुणाशी बोलायचं? याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती यादी त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे,” असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…