-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पक्षाचा जाहीरनामा आज (१५ एप्रिल) प्रकाशित केला आहे. (सर्व फोटो साभार- वंचित बहुजन आघाडी फेसबुक पेज)
-
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
-
या जाहीरनाम्यात काय?
कंत्राटी कामगारांना ५८ वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय. तसेच एन.आर.सी. आणि सी.ए.ए. कायद्याला विरोध कायम. -
शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन केले, तर त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षेची नोंद.
-
केंद्र आणि राज्यातील शिक्षणासाठीची तरतूद ३ टक्कयांवरुन ९ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन.
-
नवीन औद्योगिक धोरण राबवणार, त्यातून शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल.
-
कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान ९ हजार आणि सोयाबीनला ५ ते ६ हजार भाव देण्याचे आश्वासन.
-
शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन.
-
“ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एससी, एसटी यांना जे आरक्षण मिळत आहे, त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार.” असेही आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”