-
भाजपाने नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्रातील सातारामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून उदयनराजेना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. परंतु अखेर, आज त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Photo Source- Chhatrapati Udayanraje Bhonsle /Facebook Page)
-
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपामधून विरोध असल्याची चर्चा होती. (Photo Source- Chhatrapati Udayanraje Bhonsle /Facebook Page)
-
अजित पवार गटाची भूमिका ठरणार निर्णायक
उदयनराजेंना भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी चे दोन्ही गट शशिकांत शिंदेंना मदत करतील अशी भीती भाजपाला होती. राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे झाले असले तरी कार्यकर्ते मात्र एकत्रच आहेत. (Photo Source- Chhatrapati Udayanraje Bhonsle /Facebook Page) -
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजपा कोणाची नाराजी आणि जोखीम ओढून घ्यायला तयार नाही. त्यामुळे अजित पवार गट आता उदयनराजेंना समर्थन देतात की शशिकांत शिंदेना मदत करणार हे पाहावं लागणार आहे. (Photo Source- Chhatrapati Udayanraje Bhonsle /Facebook Page)
-
तर, महाविकास आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना होणार आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसऱ्या यादीत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी प्रचाराला देखिल सुरुवात केलेली आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
काल (१५ एप्रिल) आमदार शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्यासह निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला लोकसभेचा अर्ज दाखल केला आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)
-
दरम्यान, महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. त्यामुळे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना साताऱ्यात निश्चित मानला जात होता. (Photo Source- Chhatrapati Udayanraje Bhonsle /Facebook Page)
-
त्यामुळे साताऱ्यात यावेळी तुतारीचा नाद घुमणारं की भाजपाचे कमळ फुलणारं? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. साताऱ्यामध्ये ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात, लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. (Photo Source- Shashikant Shinde/Facebook Page)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”