-
आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ४० नावांचा समावेश आहे.
-
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील या यादीमध्ये आहेत.
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच नाव यादीमध्ये आहे.
-
पक्षाच्या प्रवक्ता आतिशी यांचेही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.
-
संजय सिंह यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. ते काही दिवसाआधीच तुरुंगातून बाहेर आले आहेत.
-
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि ईडीच्या अटकेत असलेले मनीष सिसोदिया यांनाही या यादीत स्थान दिले आहे.
-
कैलाश गेहलोत हेही स्टार प्रचारक म्हणून पक्षाचं काम करणार आहेत.
-
सौरभ भारद्वाज हे तरुण नेते पक्षाचा प्रचार करणार आहेत.
-
दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय सुद्धा पक्षाचा प्रचार करताना दिसतील.
-
पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख