-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ एप्रिल रोजी प्रचार संपल्यानंतर भाजपाप्रणित एनडीए आघाडीच्या सर्व उमेदवारांना व्यक्तिगत पत्र लिहिले. (सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी, फेसबुक पेज)
-
आपला संदेश प्रत्येक एनडीए उमेदवाराच्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा मोदी यांनी त्यात व्यक्त केली आहे.
-
देशाच्या सद्य: परिस्थितीला उज्ज्वल भविष्याशी जोडण्यासाठी ही लोकसभा निवडणूक एक संधी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
-
‘‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केला आहे’’, हा माझा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही मोदी यांनी पत्रात केली आहे.
-
मोदी यांनी पाठवलेली दोन पत्रे भाजपाच्या उमेदवारांनी प्रसारित केली आहेत. त्यापैकी एक पत्र तमिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काईम्बतूरचे उमेदवार के. अण्णामलाई यांना इंग्रजीत, तर दुसरे भाजपाचे मुख्य प्रवक्ते आणि उत्तराखंडच्या पौरी गढवाल मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल बलुनी यांना हिंदीत लिहिलेले आहे.
-
या पत्रांद्वारे पंतप्रधानांचा संदेश प्रादेशिक भाषांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आल्याचे सांगितले.
-
के. अण्णामलाई यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
-
‘गेल्या दहा वर्षांत समाजातील प्रत्येकाच्या अडचणी दूर करून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यात आला. तथापि, अद्याप खूप काही करणे बाकी असून प्रत्येकाला चांगल्या जीवनाची हमी देणाऱ्या आपल्या ‘मिशन’साठी ही निवडणूक निर्णायक असेल.” असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
-
“गेल्या पाच-सहा दशकांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सर्व कुटुंबांना, विशेषत: कुटुंबातील ज्येष्ठांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, ते त्यांना आठवत असेल. म्हणून ही निवडणूक आपल्या वर्तमानाला आणि उज्ज्वल भविष्य काळाशी जोडणारी एक संधी आहे.’’ अस या पत्रातून सांगण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत