-
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात अजित पवार यांनी काल (१७ एप्रिल) निवडणूक प्रचारासाठी व्यापारी, डॉक्टर आणि वकील यांचे स्वतंत्र मेळावे घेतले. येथील भाषणात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली. (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)
-
ते म्हणाले, “आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणे कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.” (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)
-
तर डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात बोलताना पवार पुढे म्हणाले, “रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या मनात काय आहे, असे विचारा. त्यांनी आमचे नाव घेतले, तर खूप चांगली वागणूक द्या, दुसऱ्याचे नाव घेतले, तर असे इंजेक्शन टोचा की…” असे म्हणत त्यांनी वाक्य अर्धवट सोडले व माफी मागून, “मला असे काही म्हणायचे नाही,” अशी पुष्टी जोडली. (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)
-
डॉक्टरांनी काही जाचक सरकारी अटी शिथिल करण्याची मागणी केली होती. त्याचा संदर्भ घेऊन पवार म्हणाले, “काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ७९० पर्यंत घसरल्याचे पाहता यापुढे द्रौपदीप्रमाणे विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही,” असं पवार म्हणाले आहेत. (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विरोधकांचे टीकास्त्र
“मुलींचा जन्मदार घटल्यास द्रौपदीसारखी स्थिती होईल, हे वक्तव्य राज्यातील सर्व महिलांचा अवमान करणारे असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली. मुलींचा जन्मदर हा चेष्टेचा विषय होऊ शकत नाही. प्रचारकाळात अजित पवारांचा तोल सुटल्याचे हे निदर्शक आहे, असे त्या म्हणाल्या. आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्यांना नोटीस पाठवणार का, असा सवालही चव्हाण यांनी केला.” (Photo Source- Vidya Chavan /Facebook Page) -
आमदार रोहित पवारांची टीका
द्रौपदीचं उदाहरण द्यायचं काय कारण होतं? महिलांचा अवमान झाला. दादा आता जेवढे भाषण करतील त्यांचा भाषणावरचा तोल सुटत जाईल. मुंबई – दिल्लीवरून त्यांना भाषणं येतात, ते भाषण दादा वाचतात. वाचण्याच्या नादात दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपा करते”, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. विरोधकांकडून अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचाही दावा केला गेला. रोहित पवारांनीही एक्सवरून पोस्ट करून निवडणूक आयोगाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. (Photo Source- Rohit Rajendra Pawar/Facebook Page) -
अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, “यावर माझं एकच उत्तर, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी”! (Photo Source- Supriya Sule/Facebook Page)
-
दरम्यान, आता अजित पवारांनी यासगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकिल आणि डॉक्टर होते. ती जाहीर सभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तेथे हजर होते. “कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो, आम्ही असं करणार तसं करणार. ते काही प्रलोभन दाखवणार का? विकासकामांना निधी देण्याचं कामच लोकप्रतिनिधींचं असतं. त्यामुळे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की आतापेक्षा जास्त निधी आणि जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आचारसंहितेचा भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी घेत असतो. छोट्या हॉलमधील वक्तव्य होतं”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)
-
ते पुढे म्हणाले, राहुल गांधी परवा म्हणाले की आम्ही तुमच्या बँक खात्यात खटाखट पैसे टाकू तसं मी आमच्या ग्रामीण भाषेत म्हणालो की कचा कचा बटणं दाबा. (Photo Source- Ajit Pawar/Facebook Page)

Transshipment Facility : बांगलादेशची चीनशी जवळीक, भारतानं घेतला मोठा निर्णय; ‘ही’ सुविधा केली पूर्णपणे बंद!