-
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक जागांवरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेना- भाजपाच्या युतीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र यंदा महायुतीत ही जागा भाजपाने आपल्याकडे घेत आज केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना येथून उमेदवारी दिली आहे. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)
-
मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. सामंत बंधू गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)
-
कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत, मतदारसंघ आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नारायण राणेंबरोबर, महायुतीबरोबर असेल, असे स्पष्टीकरण सामंत बंधूंनी पत्रकार परिषद घेऊन दिले आहे. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)
-
लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडून आले होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. परंतू विनायक राऊत ठाकरे गटातच राहीले. (Photo Source- Vinayak Raut/Facebook Page)
-
त्यामुळे, विनायक राऊत यांनाच शिवसेना उबाठा पक्ष रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी देणार हे नक्की होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माघार घेत भाजपाचे नारायण राणे यांना महायुतीकडून हिरवा झेंडा दाखवला आहे. तर विनायक राऊत यांना महाविकास आघाडीने ताकद दिली आहे. (Photo Source- Vinayak Raut/Facebook Page)
-
शिवसेना उबाठा पक्षाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी अर्जही दाखल केला आहे. तर, उद्या (१९ एप्रिल) नारायण राणे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. (Photo Source- Vinayak Raut/Facebook Page)
-
शिवसेनेत फूट पडल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. अशा स्थितीमध्ये शिंदेची आणि त्यांच्या आमदारांची साथ भाजपाला मिळणार असली तरी, ठाकरेंचे शिलेदारही त्यांचा किल्ला ताकदीने लढवतील. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)
-
आता रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण कोणाला भारी पडणार? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात, लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. (Photo Source- Narayan Rane/Facebook Page)

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य