-
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध सुळे असा थेट सामना यंदा पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा सुद्धा आज पार पडली विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं म्हणजेच लेक रेवती व मुलगा विजय हे सुद्धा आईच्या प्रचारासाठी सहभागी झाले होते.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
महाविकास आघाडीच्या या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यावर झालेल्या सभेत शरद पवारांसह अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सुषमा अंधारे यासुद्धा उपस्थित होत्या. (फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
यापूर्वी सुद्धा काही मोजक्या प्रचारसभांना सुप्रिया सुळे या आपले पती सदानंद सुळे, लेक रेवती व मुलगा विजय यांच्यासह दिसल्या होत्या.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना या फोटोंमधून तरी सुप्रिया यांना सुळे कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता सुळे, कोल्हे आणि धंगेकरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले व त्यानंतर रास्ता पेठ येथे महाविकास आघाडीची सभा झाली होती.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)
-
एकीकडे महाविकास आघाडीने आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे तर दुसरीकडे बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पुणे आणि शिरूर लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी तर बारामतीसाठी ७ मे ला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीकडून या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून प्रचार सुरू झाला आहे.(फोटो: एक्सप्रेस/पवन खेंगरे)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का