-
१९ एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून, पहिल्या टप्प्यात २१ राज्यात एकूण १०२ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. याबरोबरच अरुणाचल आणि सिक्कीमच्या ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे. या सर्व लोकसभा आणि विधानसभा जागांसाठीचा निवडणूक प्रचार बुधवारी सायंकाळी संपला आहे. (प्रातिनिधीक फोटो)
-
पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या सर्व २, आसामच्या १४, बिहारमधील ४, छत्तीसगडच्या ११, मध्य प्रदेशच्या ६ जागा, महाराष्ट्राच्या ५ जागा, मणिपूरच्या २ जागा, मेघालयच्या २ जागा, मिझोरामची १ जागा, सिक्कीममधील १, नागालँडमधील १, राजस्थानमधील १२, तामिळनाडूमधील सर्व ३९, त्रिपुरातील १, उत्तर प्रदेशातील ८, लक्षद्वीपमधील १, पुद्दुचेरीतील १, उत्तराखंडमधील सर्व ५, पश्चिम बंगालमधील ३ जागा, अंदमान आणि निकोबार बेटांमधून एका आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान पार पडणार आहे. (प्रातिनिधीक फोटो)
-
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील ५ मतदारसंघांत निवडणूक होत आहे. विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. या मतदारसंघात गेल्या तीन आठवड्यांपासून उमेदवार आणि नेत्यांनी जोरात प्रचार केला. आजपासून या मतदारसंघातील प्रचार थांबला आहे. आता शुक्रवारी १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. (प्रातिनिधीक फोटो)
-
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील या जागांवर ‘या’ उमेदवारांमध्ये होतेय लढत. (प्रातिनिधीक फोटो)
-
नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सामना आहे. या टप्प्यात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून जिंकले तर त्यांच्या विजयाची हॅट्ट्रिक होईल. (इतर उमेदवार देखील आहेत.)
-
नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. येथे महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत आहे. (इतर उमेदवार देखील आहेत.)
-
भंडारा-गोंदिया हा ‘दिग्गजांना पराभूत’ करणारा मतदारसंघ, अशी ओळख असून येथील राजकीय समीकरणे प्रत्येक वेळी बदलतात. येथे भाजपाचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. (इतर उमेदवार देखील आहेत.)
-
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. येथे भाजपाकडून विद्यमान खासदार अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होत आहे. (इतर उमेदवार देखील आहेत.)
-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने सर्व ताकद पणाला लावली आहे. वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. (इतर उमेदवार देखील आहेत.)
-
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ९५ लाख ५४ हजार ६६७ मतदार या ९७ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये ४८ लाख २८ हजार १४२ पुरुष मतदार आहेत तर ४७ लाख २६ हजार १७८ महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय ३४७ ट्रान्सजेंडर मतदार आहेत. (प्रातिनिधीक फोटो)
-
निवडणूक आयोगाने एकूण १० हजार ६५२ मतदान केंद्रे तयार केली आहेत. ज्यामध्ये २१ हजार ५२७ बॅलेट युनिट्स आहेत, १३ हजार ९६३ कंट्रोल युनिट्स आणि १४ हजार ७५५ व्हिव्हीपॅट मशिन्स आहेत. (फोटो साभार- भारतीय निवडणूक आयोग)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”