-
चेन्नईतील एका मतदान केंद्रावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सपत्नीक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केले. (Photo Source- Mk Stalin/FacebookPage)
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही नागपूरमध्ये त्यांचे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावली. (Photo Source- ANI)
-
दिब्रुगडमधील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते सर्बानंद सोनोवाल इतर मतदारांसह मतदान करायला पोहोचले. त्यावेळी त्यांनी हाताच्या बोटांनी विजयाची खूण करुन दाखवली. (Photo Source- Sarbananda Sonowal/X)
-
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केले आहे. (Photo Source-Dr.Manik Saha/FacebookPage)
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि त्यांचे कुटुंबीय खतिमा येथे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर शाईने खूण केलेले बोट दाखवत आहेत. (Photo Source- Pushkar Singh Dhami /FacebookPage)
-
तवांग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू दिसत आहेत. (Photo Source- Pema Khandu/FacebookPage)
-
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात त्यांचे मतदान केले. मेघालयात आज १९ एप्रिल रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शिलाँग आणि तुरा या दोन लोकसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. (Photo Source- Conrad K Sangma/FacebookPage)
-
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी सकाळी लवकर मतदान केंद्रावर पोहोचून त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. (Photo Source- Diya Kumari /FacebookPage)
-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे कुटुंबीयांसह मतदानाला हजेरी लावली. (Photo Source- Devendra Fadanvis/FacebookPage)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा