-
कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. (सर्व फोटो साभार- शाहू छत्रपती, फेसबुक पेज)
-
त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची मालमत्ता सर्वाधिक २९७ कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
शाहू महाराजांच्या नावे स्थावर व जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती आहे.
-
त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटींची संपत्ती आहे. शाहूमहाराज हे निष्कर्जी आहेत.
-
त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये असून, आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे.
-
ज्यामध्ये, जगातील दुर्मिळ मेबॅक कार, तीन मर्सिडीज बेंझ, प्रत्येकी इनोव्हा आणि महिंद्रा थार या वाहनांचा समावेश होतो.
-
राधानगरी तालुक्यातील न्यू पॅलेस हे घर शाहू महाराज यांच्या नावावर आहे.
-
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत.
-
कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का