-
देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. (सर्व फोटो साभार- अमित शाह, फेसबुक पेज)
-
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुजरातच्या गांधीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
अमित शाह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघात पाच लाख मतांचा आकडा (मताधिक्य) पार केला होता.
-
शाह यांच्याविरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
-
गुजरातमधील भाजपाचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये अमित शाह विरुद्ध सोनल पटेल अशी लढत पाहायला मिळणार आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघ असा आहे, जिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे. भाजपाचा हाच बालेकिल्ला भेदण्यासाठी काँग्रेसने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
-
अमित शाह यांचा बालेकिल्ला मानला जाणारा गांधीनगर मतदारसंघात यावेळेस कोणता निकाल लागणार याकडे देशाचे लक्ष असेल.
-
गांधीनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे, तर ४ जूनला निकाल लागणार आहे.
-
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमित शाह काय म्हणाले?
-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. मी (अमित शाह) गांधीनगरच्या जनतेला आवाहन करतो की, नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित केले, समृद्ध केले. ८० कोटीपेक्षा जास्त गरिबांच्या जीवनात उत्साह आणण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही निवडणूक ४०० पारचा आकडा पार करत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे”, असे अमित शाह म्हणाले.
-
ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा आणि त्याआधी मी संपूर्ण देशभरात दौरा करुन आलो. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा देत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वागत केले. जनतेचा आशीर्वाद नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगात भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे हे पाच वर्ष महत्वाचे आहेत”, असे अमित शाह म्हणाले.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”