-
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी दिली आहे.
-
रविंद्र धंगेकरांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती दिली आहे.
-
रविंद्र धंगेकर हे कोट्यधीश आहेत. त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याकडेही कोट्यवधींची मालमत्ता आहे.
-
एकूण ८ कोटी १६ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्तेची नोंद त्यांच्या शपथपत्रात केलेली आहे.
-
शपथपत्रातील माहितीनुसार रविंद्र धंगेकर यांच्यावर ३५ लाख रुपयांचे कर्ज आहे.त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्याही नावावर कर्ज आहे. ३२ लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज शपथपत्रात नमूद केले आहे. धंगेकर दाम्पत्यावर एकूण ७१ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज आहे.
-
महत्वाचे म्हणजे त्यांच्या संपत्तीत वाढ न होता घट झाल्याचं समोर आलं आहे. रविंद्र धंगेकर यांच्या स्वतःच्या नावावर ४ कोटी ५९ लाख ६३ हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे.
-
एका वर्षापूर्वी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञपत्रातील मालमत्ता आणि लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञपत्रातील मालमत्तेत २३ लाखांची घट झाल्याचे दिसून येत आहे.
-
त्यांच्या कौटुंबिक कामाबद्दल शेती, सोने चांदीच्या कारागिरीचा व्यवसाय नमूद केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- Ravindra Dhangekar – रविंद्र धंगेकर, फेसबुक पेज)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”