-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत.
-
राणेंनी आपल्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
-
या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्याकडे १३७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
-
यामध्ये नारायण राणे यांची स्वतःची, म्हणजेच वैयक्तिक मालमत्ता ही ३५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे.
-
तर राणेंच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर ७५ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं या प्रतिज्ञपत्राद्वारे त्यांनी सांगितलं आहे.
-
राणे कुटुंबीयांवर २८ कोटी रुपयाचे कर्ज असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले गेले आहे.
-
तर राणेंकडे १ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपयांचे सोने आहे.
-
सोने खरेदीच्या बाबतीत त्यांच्या पत्नी नीलम यांच्याकडेही १ कोटी ३१ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सोने आहे.
-
दरम्यान,७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- नारायण राणे, फेसबुक पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”