-
अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर आज जोरदार राडा पाहायला मिळाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यात सभेच्या जागेवरून जोरदार खडाजंगी झाली. (Photo – Bacchu Kadu Facebook)
-
बच्चू कडू यांच्याकडे सायन्स कोर मैदानात २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रचार सभा घेण्याची परवानगी होती. मात्र पोलिसांनी त्यांना सभास्थळी जाण्यापासून अडविले. (Photo – Bacchu Kadu Facebook)
-
बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे असलेली निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतच पोलिसांनी दाखविली आणि सभा घेण्यापासून का विरोध केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
-
उद्या २४ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. त्यासाठी बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले.
-
पोलीस हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करून बच्चू कडू यांनी तिथेच पोलिसांसमोर ठिय्या मांडला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना म्हटले की, निवडणुकीच्या वेळी असे प्रसंग अनेकदा येतात. मोठे नेते जेव्हा प्रचारासाठी येतात, तेव्हा त्यांना प्राधान्य दिले जाते. बच्चू कडू यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यातून नक्कीच तोडगा निघेल.
-
दरम्यान जोरदार पावसामुळे सायन्स कोर मैदानावरील अमित शाह यांच्या सभेचा मंडप कोसळला. “हनुमानजीने त्यांच्या मंडपावर एक लाथ मारली. त्यांची हनुमान चालीसा चुकीच्या हेतूसाठी होती आणि आता आमच्याबरोबर जे चुकीचं होत होतं, त्याला देवाने उत्तर दिलं आहे”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
-
रवी राणा भाजपाला बदनाम करतोय, हे अमित शाहांनाही माहीत नसेल. भाजपा सारख्या शिस्तप्रिय पक्षाला रवी राणा सारखे लोक बदनाम करत आहेत. आता भाजपाला रवी राणा सारखे लोक नियंत्रित करत आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
-
प्रहार जनशक्ती पक्षाकडून नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुब निवडणूक लढवित आहेत. २६ एप्रिलला अमरावतीमध्ये मतदान होणार असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे