-
जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची दहा वर्षे आमदार, २५ वर्षे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. यंदा पुन्हा त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. (सर्व फोटो साभार- रावसाहेब दानवे, फेसबुक पेज)
-
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदावर काम करणारे जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या संपत्तीचे तपशीलही उपलब्ध झाले आहे.
-
त्यांची एकूण जंगम मालमत्ता ४ कोटी ५१ लाख ३२ हजार ६१ रुपये एवढी असून त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांची जंगम मालमत्ता ८८ लाख ४ ४ हजार १० रुपये एवढी दर्शविली आहे.
-
त्यांनी आयकर विभागाकडे दिलेल्या संपत्तीच्या विवरणात २०२१- २२ मधील त्यांचे उत्पन्न २०२२ -२०२३ मध्ये घटल्याचे त्यांनी दर्शवले आहे. या वर्षात ते ७५ लाख २० हजार एवढे होते. तर तत्पूर्वी ते ८५ लाख ११ हजार ३७० रुपये एवढे होते.
-
स्थावर मालमत्तेमध्ये भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे सहा एकर २८ गुंठे जमीन असून पत्नीच्या नावे १२ एकर २३ गुंठे जमीन आहे. त्यांचे बाजारमूल्य २३ लाख ४२ हजार एवढे असून पत्नीच्या नावे असणाऱ्या जमिनीची किंमत ४२ लाख ५२ हजार २०२ एवढी आहे. भोकरदन व कोठादाभाडी या गावी स्वत:च्या नावे ३ एकर १२ गुंठे तर पत्नीच्या नावे ३ एकर १५ गुंठे जमीन असल्याचे नमूद आहे.
-
याशिवाय राजूर, पळसखेडा दाभाडी, नळणी (ता. भोकरदन), जालना, जळगाव सपकाळ, विझोरा, फावडा, पद्मावती, तपोवन आदी ठिकाणी जमिनी आहेत.
भोकरदन येथे निवासी इमारत असून पुण्यातील बाणेर येथे पत्नीच्या नावे निवासी इमारत असल्याची नोंद शपथपत्रात आहे. -
२४ कोटी ३७ लाख १६ हजार ५७९ रुपयांची बाजारमूल्य असलेली मालमत्ता व जमिनी स्वत:च्या नावाने तर १२ कोटी ८३ लाख ३८ हजार पाच एवढे बाजारमूल्य असणाऱ्या जमिनी पत्नीच्या नावावर असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.
-
दोन वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या वेळी डॉ. कल्याण काळे आता मैदानात उतरले आहेत. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. जालन्यात रावसाहेब दानवे विरूद्ध कल्याण काळे अशी लढत रंगणार आहे.
-
जालन्यात १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…