-
लोकसभा निवडणूक २०२४ साठी पहिल्या टप्प्याचे मतदान देशभरात पार पडले. पहिल्या टप्प्यातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. हा लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठा टप्पा होता. (फोटो-PTI)
-
देशभरातील विविध मतदान केंद्रांवरून मतदारांचे अतिशय उत्साहात मतदान करतानाचे छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमधुन लोकांनी मतदान करण्यासाठी प्रचंड प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.
हे चित्र कोहिमा, नागालँड येथील आहे, यामध्ये मतदार मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि मतदान अधिकारी त्यांच्या बोटांवर शाईचा ठिपका लावत आहेत. (फोटो-PTI) -
हे छायाचित्र मुझफ्फरनगरमधील आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कडेवर घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्याचं दिसत आहे. (फोटो-PTI)
-
मुझफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अनेक वृद्ध मतदार उस्फुर्तपणे मतदान केंद्रांवर पोहोचल्याचे पहायला मिळाले.(फोटो-PTI)
-
मदुराईतील असेच एक छायाचित्र. (फोटो-PTI)
-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक नागपुरमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान केले, त्यानंतर त्यांनी शाई लावलेले बोट पत्रकारांना दाखवले. (फोटो-PTI)
-
बिकानेरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी तृतीयपंथी समुदायातील मतदारांनीही उत्साहात मतदानाला हजेरी लावली. (फोटो-PTI)
-
चेन्नई येथील मतदान केंद्रावर जाऊन लोकसभा निवडणुकीचे मतदान केल्यानंतर तामिळनाडूचे मंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांची पत्नी कृतिका उदयनिधी यांनी शाई लावलेले बोट पत्रकारांना दाखवले. (फोटो-PTI)
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शिवगंगाई जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. (फोटो-PTI)
-
मेघालयातील री भोई जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या. (फोटो-PTI)
-
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात मतदानासाठी महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या छायाचित्रामध्ये बुरखा घातलेल्या महिला दिसत आहेत. (फोटो-PTI)
-
जयपुरच्या बरवाडा गावातील नवविवाहित जोडप्यानेही मतदान करण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. (फोटो-PTI)
-
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मतदान केल्यानंतर मतदारांनी सेल्फी पॉइंटवर त्यांचे छायाचित्रे काढली. (फोटो-PTI)
-
योगगुरू रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदाचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी हरिद्वार जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान केले. (फोटो-PTI)
-
हरिद्वारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात साधू महाराजांनीही मतदान केले. (फोटो-PTI)
-
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यासाठी वृद्ध महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. (फोटो-PTI)
-
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अंदमान आणि निकोबार बेटांवरील मतदारसंघातही मतदान झाले. शाँपेन आदिवासी समाजाच्या नागरिकांनी येथे मतदानासाठी हजेरी लावली. (फोटो-PTI)
-
निकोबार बेटाच्या जंगलात राहणारा शाँपेन आदिवासी समूह हा अश्मयुगातील शेवटच्या जिवंत आदिवासी गटांपैकी एक मानला जातो. (फोटो-PTI)
-
नॅशनल पिपल्स पार्टीच्या उमेदवार अगाथा संगमा यांनी देखील मेघालयातील तुरा येथे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. (फोटो-PTI)
-
नागपुरमध्ये मतदानासाठी मतदार रांगेत उभे असल्याचे दिसून आले. (फोटो-PTI)
हेेही पहा- Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; भाजपावर चौफेर टीकास्र! म्हणाले, “मह…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”