-
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
-
महाराष्ट्रातही प्रचार शिगेलो पोहोचला असून शिरुर हा लोकसभा मतदारसंघ विशेष चर्चेत आहे.
-
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे.
-
प्रचारादरम्यान हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
-
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी आढळराव हे पहिल्या पसंतीचे उमेदवार नाहीत, असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना उभं करणार होते. मात्र भुजबळ यांनी मात्र त्यास नकार दिला.
-
त्यानंतर मग आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असा दावा कोल्हे यांनी केला.
-
आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यावर आरोप करत होते. आज तेच आढळराव पवार यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. म्हणून त्यांच्याविषयी फार बोलणे उचित होणार नाही.
-
अशा शब्दांत कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर टीका केली. (सर्व फोटो अमोल कोल्हे यांच्या फेसबुक खात्यावरून साभार.)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड