-
देशामध्ये लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यामधील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, १९ एप्रिल रोजी देशात पाहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे.
-
तर उद्या म्हणजेच २६ एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशात कुठे आणि किती जागांसाठी मतदान पार पडत आहे? तसेच महाराष्ट्रात किती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
-
या टप्प्यामध्ये एकूण १३ राज्यामध्ये मतदान होणार आहे. ८९ जागांसाठी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये मतदान होणार आहे.
-
मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशात होणाऱ्या लक्षवेधी लढती या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
-
बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी भाजपाकडून तिसऱ्यांदा मथुरा मतदारसंघातून मैदानात आहेत.
-
मेरठमध्ये रामायण मालिकेतील रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अरुण गोविल हेही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.
-
याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून सीपीआय आणि भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध लढत देत आहेत.
-
काँग्रेसचे नेते शशी थरूर हे तिरुअनंतपुरममध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी सामना करत आहेत.
-
महाराष्ट्रातील या आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी -
मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात होणाऱ्या लक्षवेधी लढती
अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांची लक्षवेधी लढत होत आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परभणी मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांची लढत महायुतीचे महादेव जाणकार यांच्याशी होत आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यात लढाई होत आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणायची जबाबदारी नुकतेच भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांच्यावर आहे.काँग्रेसचे वसंत चव्हाण यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न