-
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची बीडमधील नाळवंडी येथे काल २८ एप्रिल रोजी सभा होती.
-
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा नेत्या पंकजा मुंडे या महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक मैदानात आहेत. सध्या बीडमध्ये दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
-
पंकजा मुंडेंनी बीडमधील नाळवंडी येथे पावसात पार पडलेल्या या प्रचारसभेतून जोरदार भाषण करत विरोधकांना इशारा दिला आहे.
-
पंकजा मुंडे म्हणाल्या, “असा मतांचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर असाच विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही. देशामध्ये आणि राज्यामध्ये बीड जिल्हा एक विकासाचं नवीन समीकरण निर्माण करणार आहे, असा मला विश्वास आहे.”
-
“तुम्ही उन्हात तर मी उन्हात आणि तुम्ही पावसात तर मीदेखील पावसात. आता कुणीतरी सांगितलं की, ही निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे. मात्र, बीड जिल्ह्याची जनता विकासाच्या बाजूने आपलं मत देईल हा मला विश्वास आहे”, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.
-
“तुम्हाला कांद्याची चिंता आहे. कापसाची चिंता आहे. मी तुम्हाला वचन देते, तुमच्या या चिंता सोडवण्यासाठीच मी संसदेत चालले आहे. मी विकास करते असे तुम्हाला वाटते का? मी कधीही जातीवाद केला नाही. कधीही धर्माचे राजकारण केले नाही. त्यामुळे आज मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संधी दिली आहे.”
-
“बीड जिल्हा मला मान खाली घालायला लावणार नाही. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
-
“मी निवडून आले तर सामान्य माणसांना न्याय मिळेल. या सामान्य माणसांना कोणाच्या दारात जावं लागणार नाही. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आपले महायुतीचे साडेतीनसे खासदार होणार आहेत, पण विरोधकांचे तीनही खासदारही होणार आहेत का? मग आपलं मत कशाला वाया घालायचं?”, असा निशाणा पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर साधला.
-
(सर्व फोटो पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या फेसबुक खात्यावरुन साभार)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर