-
काल पुण्यातील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. (फोटो – Narendra Modi/X)
-
“महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती”, असे ते म्हणाले होते. (फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम)
-
त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत. मोदींच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर आता शरद पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम)
-
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“पंतप्रधान मोदींचे म्हणणं खरं आहे. आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे दुखणं बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे, लोकांचे संसार करणे कठीण झाली आहे, त्यासाठी १०० वेळा अस्वस्थता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अडचणी असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझं कर्तव्य आहे”, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले. -
पुढे बोलताना शरद पवारांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.
-
ते म्हणाले, “आज चांगले काम करणाऱ्यांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. ज्यांच्या हातात आज सत्ता आहे, ते लोक सत्तेचा वापर गैरवापर करत असून राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.”
-
“सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो, मात्र, आताचे सत्ताधारी या सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत”, असे ते म्हणाले.
-
“लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. जर ती टीका चुकीची असेल तर तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केलं. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.
-
(सर्व फोटो साभार- शरद पवार, फेसबुक पेज.)

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना