-
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही.
-
एकूण मालमत्ता : सुमारे ७ कोटी ६६ लाख.
-
जंगम मालमत्ता : तीन कोटी ९६ लाख. यात गायकवाड यांची एक कोटी ९६ लाख, तर पतीची दोन कोटी १० लाख. यामध्ये १० तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील ठेवी
-
स्थावर मालमत्ता : सुमारे तीन कोटी ७० लाख असून मावळ येथे ११ लाखांची शेतजमीन, अंजूर दिवे भिवंडी येथे एक कोटी ५४ लाखांचे गोदाम. मालाड मढ रोड आणि प्रतीक्षानगर येथील घरांचा समावेश.
-
कर्जे : वर्षा गायकवाड यांच्यावर एक कोटींचे कर्ज
-
उत्तर- मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
त्यांची लढत महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम यांच्याशी होणार आहे.
-
उत्तर मध्य मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाच्यवा टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.
-
(सर्व फोटो साभार वर्षा गायकवाड फेसबुक पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”