-
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी त्यांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
-
ईशान्य मुंबई मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील चार कोटींचे धनी असूनही त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही.
-
एकूण मालमत्ता : सुमारे चार कोटी
-
यात पाटील दोन कोटी ३० लाख, तर पत्नीची ४२ लाख तर दोन्ही मुलींची मिळून सुमारे एक कोटींची मालमत्ता आहे.
-
यामध्ये ४६ तोळे सोने असून त्यातही पत्नीकडे ३० तोळे सोन्याचे दागिने आहेत.तसेच बँकेतील ठेवी, वित्तीय संस्थामधील गुंतवणुकीचा समावेश आहे.
-
स्थावर मालमत्ता: १८ लाख. भांडुप गाव येथे २२५ चौरस फुटांची खोली असून ५१ हजार रुपयांना खरेदी केलेल्या या खोलीची आजची किंमत १८ लाख रुपये असून एवढीच त्यांची स्थावर मालमत्ता आहे
-
त्यांची लढत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्याशी होणार आहे.
-
ईशान्य मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- संजय दिना पाटील, फेसबुक पेज)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षिदार