-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक योजनेवरही त्यांनी भूमिका मांडली आहे.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक देश एक निवडणूक योजनेवर त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, “वन नेशन वन इलेक्शन ही आमची कटिबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली. याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल.”
-
त्यानंतर अमित शाह यांनीही आता या विषयावर भाष्य केले आहे.
-
एक देश, एक निवडणूकसाठी सरकारं अल्पावधीत बरखास्त करणार?
एक देश, एक निवडणूक अर्थात देशभरातील सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे. यासाठी संसदेत कायदा पारित करण्याच्या तयारीत सरकार असून हे अस्तित्वात आल्यास राज्यांमधील सरकारं अल्पावधीत बरखास्त केली जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. -
यावर भाष्य करताना अमित शाह यांनी ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल, याचं नियोजन सांगितलं आहे.
-
ते म्हणाले, “देशात ६० च्या दशकापर्यंत वन नेशन, वन इलेक्शन अस्तित्वात होतंच. इंदिरा गांधींनी सामुहिकरीत्या विरोधकांची सरकारं तोडली तेव्हा हे गणित थोडं बिघडलं. आता कायदा करून या निवडणुका एकत्र करण्याची गरज आहे.”
-
“पाच वर्षांत पक्ष एकदाच जनतेसमोर जातील, मतदार एकदाच मतदान करतील आणि ज्याला बहुमत मिळेल, तो सरकार चालवेल. यात अडचण काय आहे?” असा सवाल अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे.
-
-
कशी राबवली जाणार योजना?
“ज्यांची टर्म शिल्लक आहे, ती कुणी संपवू शकत नाही. नवीन टर्म मात्र २०२९ पर्यंतच असेल, त्यानंतर नवीन निवडणुका घेऊन पुढे पाच वर्षांसाठी ती निवड होईल. या काळात निवडून आलेली सरकारं कुणीही पाडणार नाही. पण नवीन सरकारं अल्पकाळासाठी निवडली जातील आणि २०२९पासून सर्व सरकारं पाच वर्षांसाठी निवडली जातील”, असं अमित शाह म्हणाले. -
(सर्व फोटो नरेंद्र मोदी, अमित शाह या फेसबुक पेजवरुन साभार)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”