-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या सर्वच उमेदवार व्यस्त आहेत. विविध ठिकाणी सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (सर्व फोटो असदुद्दीन ओवेसी, माधवी लता या फेसबुक पेजवरुन साभार)
-
हैदराबादमध्ये यंदा असदुद्दीन ओवेसी यांच्यापुढे भाजपाच्या माधवी लता यांचं आव्हान आहे.
-
भाजपाने माधवी लता यांना हैदराबादमधून उमेदवारी दिली असून हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
-
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील यंदा जोरदार प्रचार करीत आहेत. “हैदराबाद के अमन को मजबूत करिये, ये आपके बुजुर्गों की कुर्बानीयों का नतीजा है. पतंग के निशान पर वोट डालिए, एक मत का इस्तमाल करिये (हैदराबादमधील शांतता मजबूत करा; जी तुमच्या पूर्वजांच्या बलिदानाचे फळ आहे. एआयएमआयएमच्या पतंग चिन्हाला मतदान करा. प्रत्येक मताचा वापर करा),” असा संदेश ते मतदारांना देत आहेत.
-
तर, दुसरीकडे ओवेसी यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार माधवी लतादेखील भगवे झेंडे लावलेल्या खुल्या वाहनातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. एआयएमआयएम आणि ओवेसी हे केवळ एका समुदायासाठी काम करीत असल्याचा आरोप करताना दिसत आहेत.
-
. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी पहिल्यांदा येथून खासदार झाले. त्यानंतर आणखी पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिले. २००४ मध्ये ओवेसी यांनी पदभार स्वीकारला आणि आता सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून येणे हे त्यांचे लक्ष्य आहे. २०१९ च्या मध्ये त्यांनी भाजपाच्या भगवंतराव पवार यांचा २.८२ लाख मतांनी पराभव केला होता.
-
भाजपा इतिहास घडविणार
राजकीय पदार्पण करीत असलेल्या भाजपाच्या माधवी लता यांनी त्यांच्या भाषणांद्वारे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजपा इतिहास घडविणार आहे, असे त्या ठामपणे सांगतात. -
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला त्यांनी सांगितले की, ओवेसी चिंतेत आहेत. मतदार आता उत्साही, आत्मविश्वासू व निर्भय असल्याचा दावाही त्यांनी केला. “गेल्या ४० वर्षांपासून मतदारांमध्ये, विशेषत: अल्पसंख्याकबहुल भागात भीतीचे वातावरण होते. जेथे अल्पसंख्याक मतदार कमी असतील तेथे ते (एआयएमआयएम) मतदारांवर नियंत्रण ठेवायचे आणि महिलांबद्दल अपमानास्पद भाषादेखील वापरायचे,” असा दावा लता यांनी केला.
-
मतदानाची टक्केवारी कमी
दोन्ही दावेदारांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण मतदारसंघात पसरलेल्या १९ लाखांहून अधिक मतदारांच्या मतांची टक्केवारी कमी होत आली आहे. १९८४ मध्ये ७६.७६ टक्के मतदान होते, ते २०१४ मध्ये ५३.३ टक्के व २०१९ मध्ये फक्त ४४.८४ टक्क्यांवर आले. -
लता यांना स्वयंसेवक संघाचा पाठिंबा
शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अध्यक्ष असलेल्या लता यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. २०१४ व २०१९ मध्ये ओवेसी यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे हैदराबादचे ज्येष्ठ व्हीएचपी नेते भगवंत राव पवार यांना डावलून यंदा भाजपाने लता यांना उमेदवारी दिली आहे. -
त्यांच्या प्रचारशैलीने अनेकांची मने जिंकली आहेत; तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पोस्ट टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. मुस्लीम महिलांसाठीही लता यांनी अनेक कामे केली आहेत. मुस्लीम महिलांविरुद्ध होणार्या भेदभावाबद्दल बोलणार्या लता म्हणतात की, पसमंदा मुस्लिम महिलांचा मला पाठिंबा आहे.
-
हैदराबादमध्ये जवळपास ७० टक्के मतदार मुस्लीम आहेत. त्यातील अधिकाधिक मुस्लीम एआयएमआयएमचे समर्थक आहेत. दरम्यान
हैदराबादमध्ये १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. यावेळी येथे भाजपाच्या माधवी लता बाजी मारणार की एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी त्यांचा गड राखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य