-
उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असे विधान नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान केले.
-
या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपा-ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली असताना शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली.
-
सांगली येथे चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आले असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
-
यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. “नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी अडचणीतले व्यापारी आहेत. अडचणीत आलेला व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असे चाणक्याने सांगितले आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेमाचा एवढा पान्हा फुटला असता तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशाप्रकारे तोडली नसती.”
-
“त्यांनी शिवसेना नुसती तोडली नाही तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. त्यामुळं पंतप्रधान मोदी आता दाखवत असलेलं प्रेम खोटं आहे”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
-
उद्धव ठाकरे यांच्याबाबत जवळीक दाखवून मोदींनी उबाठा गटासाठी पुन्हा एकत्र येण्याची जागा निर्माण केली आहे का? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी खिडकीच काय दरवाजे उघडले तरी आम्ही त्यांच्या दारात उभे राहणार नाहीत. महाराष्ट्रात स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक आहे.”
-
“याचा अर्थ नरेंद्र मोदी आता निवडणुकीत पराभूत होत आहेत, त्यांना बहुमत मिळत नाहीये. म्हणून ते आता फटी, दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.”
-
(सर्व फोटो- संजय राऊत/फेसबुक पेज)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल