-
आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एबीपी न्यूजला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना त्यांनी मोदी सरकार आणि विरोधकांवर टीका केली आहे.
-
या मुलाखतीत ते म्हणाले “भाजपा सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळ दाखवायला घाबरते.” तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, या अमित शाहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे जाणून घेऊयात.
-
या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. “आजची भाजपा ही जुनी भाजपा नाही. आजची भाजपा ही चायनीज मॉडेलवर चालत आहे. ज्या चीनला डोळे दाखवायला केंद्रातील मोदी सरकार घाबरते, मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या सरकारडून सुरू आहे”, असे ते म्हणाले.
-
“भाजपाला संविधान मान्य नाही”
“भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य नाही. त्यांना लोकशाही मान्य नाही. आज देशातील महिला घाबरलेल्या आहेत. कर्नाटकातलं उदाहरण ताजे आहे. कर्नाटकमधील रेवन्ना प्रकरण भयंकर आहे. भाजपाने मुंबईतही अशाच एका उमेदवाराला तिकीट दिलं आहे”, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. -
अमित शाहांच्या आरोपाला दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, शिवसेनेत फूट पडली, कारण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. या आरोपालाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. “अमित शाह यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. त्यांना आरोपच करायचे असतील तर ते करू शकतात. पण शिवसेना का आणि कोणी फोडली, महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. आज बाहेरचे लोक येऊन असली शिवसेने आणि नकली शिवसेना कोणती हे सांगत आहे. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही”, असेही ते म्हणाले. -
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठाकरेंची टीका
पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरूनही ताशेरे ओढले. “निवडणूक आयोग आज पूर्ण भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. आमचा पक्ष दोन गटात विभागला गेला, तेव्हा त्याचा रिपोर्ट त्यांनी भाजपाच्या सांगण्यावरून लिहिला होता. आज निवडणूक आयोगाने आम्हाला जय भवानी जय शिवाजी हा नारा लाऊ नये, असा आदेश दिला आहे. जय भवानी जय शिवाजी हे नारा महाराष्ट्रात नाही द्यायचा तर कुठे म्हणायचं? एकंदरितच या लोकांचा महाराष्ट्र द्वेष पुढे आला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. -
(सर्व फोटो साभार- शिवसेना फेसबुक पेज)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा