-
देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान ७ टप्प्यामध्ये होत असून, यातील २ टप्पे पार पडले आहेत. उद्या म्हणजे ७ मे रोजी या प्रक्रियेचा पुढील तिसरा टप्पा आहे.
-
या तिसर्या टप्प्यामध्ये देशभरात एकूण १३५२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत
-
१२ राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशातील मिळून एकूण ९४ लोकसभा मतदारसंघांत उद्या म्हणजेच ७ मे २०२४ या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
-
उद्याच्या टप्प्यात गुजरात राज्यामध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होत आहे.
आसाममधील ४ जागा, बिहार ५, छत्तीसगड ७ जागा, गोवा २ जागा, कर्नाटक १४, मध्य प्रदेश ८ जागा, महाराष्ट्र ११ जागा, उत्तर प्रदेश १० जागा, पश्चिम बंगाल ४ जागा, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव प्रत्येकी २ जागा, जम्मू काश्मीर १ जागा -
महाराष्टात या टप्प्यात एकूण ११ जागांसाठी मतदान होत आहे.
मतदारसंघ- बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि सोलापूर -
तिसऱ्या टप्प्यातील लक्षवेधी लढती
-
या तिसऱ्या टप्प्यात देशाचे लक्ष लागेलेले आहे अशा काही लढती होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघ आहे. बारामतीतील नणंद (सुप्रिया सुळे) विरुद्ध भावजयी (सुनेत्रा पवार) यांच्यातील लढतीने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
याशिवाय या टप्यात कोल्हापूर व सातारा यासारख्या मतदारसंघांतही लक्षवेधी सामने होत आहेत. कोल्हापुरातील दुरंगी लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना मैदानात उतरविले आहे.
-
साताऱ्यातील सामनाही रंगतदार ठरणार आहे. भाजपाच्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आव्हान दिले आहे.
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भवितव्य पणाला लागले आहे. ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच त्यांच्यापुढे आव्हान आहे.
-
सांगलीत भाजपाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. पण या दोघांना आव्हान विशाल पाटील (अपक्ष) यांनी दिले आहे. त्यांना वंचितचा पाठींबाही मिळाला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये यावेळी भाजपा पूर्ण जागा जिंकून बहुमत मिळवण्याची तयारी ठेवून असल्याची माहिती राजकीय जाणकार सांगत आहेत. अमित शहा गांधीनगरमधून, तर केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?