-
आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे.
-
या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघात मतदान सुरु झाले आहे.
-
महाराष्ट्रातील बहुचर्चित लढत असलेल्या बारामती मतदारसंघातील उमेदवारांनी आज त्यांचे मतदान केले.
-
बारामतीतील नणंद (सुप्रिया सुळे) विरुद्ध भावजयी (सुनेत्रा पवार) यांच्यातील लढतीने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
-
आज शेवटी त्यांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.
-
दोन गट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार येथे एकमेकांना टक्कर देत आहेत.
-
अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत तर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत.
-
कौटुंबिक युद्ध सुरु असलेल्या पवार परिवारातून आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.
-
दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि उमदेवार सुनेत्रा पवार यांनीही बारामतीमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला.
-
दरम्यान, बारामतीकर यंदा कोणाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकतील हे ४ जूनला निकालाच्या दिवशी कळेल.
-
(All Photos- Express photograph by Arul Horizon)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा