-
काँग्रेसचे ‘अंबानी आणि अदाणीं’शी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुधवारी प्रथमच केला.
-
या उद्याोगपतींकडून काँग्रेसला टेम्पो भरून काळा पैसा मिळाल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्या नावाने बोटे मोडणे रातोरात बंद केले का, असा सवालही मोदी यांनी केला. यावर राहुल गांधी यांनीही हिंमत असेल, तर अदानी-अंबाणींकडे ईडी पाठवा असे प्रतिआव्हान दिले.
-
पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसकडून विशेषत: राहुल गांधी यांच्याकडून आतापर्यंत अंबानी-अदानणींचा उल्लेख वारंवार केला जात होता. पंतप्रधान मोदी पाच मोठ्या उद्याोगपतींसाठी काम करतात, अशी टीकाही गांधी यांनी वारंवार केली.
-
हा मुद्दा उपस्थित करत तेलंगणातील वेमुलावाडा येथील जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले, की राजपुत्रांकडून गेल्या पाच वर्षांपासून ‘अंबानी- अदाणीं’चा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. परंतु या मुद्द्यावर बोलणे राहुल यांनी अचानक का थांबवले? सौदा तर झाला नाही ना? याबाबत काँग्रेसने देशाला स्पष्टीकरण दिले पाहिजे.
-
‘‘राफेलचा मुद्दा फसल्यानंतर त्यांनी ‘पाच उद्याोगपतीं’बद्दल ठणाणा सुरू केला. मग अंबानी-अदाणींचा जप सुरू केला. पण निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी (काँग्रेस) अंबानी-अदाणींच्या नावाने खडे फोडणे बंद केले आहे,’’ अशी टीका मोदी यांनी केली.
-
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. खरगे म्हणाले, की “काळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिले नाहीत. तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींनी आपल्याच मित्रांवर हल्ला सुरू केला आहे. त्यांचे स्थान डळमळीत झाल्याचे यावरून स्पष्ट होते.”
-
रमेश म्हणाले, ‘‘या निवडणुकीला असे वळण मिळाले आहे की, ‘हम दो हमारे दो’चे ‘पप्पा’ आपल्याच मुलांवर उलटे फिरले आहेत. पंतप्रधान आता स्वत:च्या सावलीलाही घाबरत आहेत.’’
-
मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या, ‘‘भाजपचे उद्याोगपतींशी संबंध असून त्या पक्षाने १६ लाख कोटींचे कर्जही घेतले आहे. भाजपची यंत्रणा राहुल गांधींविषयी खोटे पसरवण्यात व्यग्र आहे. राहुल आता अदानी-अंबानींचे नाव घेत नाही, असे ते म्हणतात, पण तो आणि आम्ही सर्वचजण दररोज अदाणी-अंबानींबाबतचे सत्य मांडत असतो.
-
दरम्यान , “निश्चितपणे काहीतरी संशयास्पद आहे. गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही अदाणी-अंबानींच्या नावाने ठणाणा करीत होतात. तुम्ही ते रातोरात थांबवले याचा अर्थ तुम्हाला टेम्पो भरून लुटीचा माल मिळाला आहे. काळ्या पैशांच्या किती बॅगा तुम्ही घेतल्या आहेत? तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख