-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या जोरात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे.
-
या सभेत बोलताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत.
-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
-
“दाढीवाल्यांचा चमत्कार उद्धव ठाकरे यांनी पाहिला आहे. त्यामुळे एखाद्याने आपल्यावर केलेला आघात आणि त्यापासून होणारा त्रास, या तणावातून ते टीका करतात.”
-
“मात्र, एक लक्षात ठेवा. जे जे दाढीवाले असतात ते योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करतात. हे आपण पाहिले आहे. त्यामुळे दाढीवाल्यांच्या नादी लागू नका. आता जे बिना दाढ़ी वाले आहेत, त्यांना संभाळावं”, अशा खोचक शब्दात संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
-
उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होतं की, “बाप बदलण्याची महायुतीला गरज आहे. मला नाही”.
-
यावर आता शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न शरद पवार यांना विचाराला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी शरद पवारांना नम्रपणे हात जोडले आहेत. यावर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कार्टून कसे काढले असते? याचा विचार केला तर सर्वांच्या लक्षात येईल”, असा हल्लाबोल शिरसाट यांनी केला.
-
(सर्व फोटो संजय शिरसाट या फेसबुक पेजवरून साभार.)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral