-
अजित पवार हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात, कधी ते त्यांच्या खास शैलीत एखाद्याला रागावतात, तर कधी आपल्या मिश्किल स्वभावाने उपस्थितांना हसायला भाग पडतात.
-
अजित पवारांच्या अशाच एका मिश्किल विधानाची सध्या चर्चा सुरु आहे.
-
अजित पवारांनी भरसभेत बोलताना एका ”तुला पैसे मिळाले नाही का?” असा प्रश्न विचारला आहे.
-
त्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.
-
अजित पवार हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जाऊन ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
-
अशात शिरुरमधील एका प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी एकाला त्यांच्या खास शैलीत प्रश्न विचारला आहे.
-
त्याचं झालं असं की या प्रचासभेत भाषण करताना अजित पवार यांचा माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कर्कश्य आवाज येऊ लागला.
-
त्यावरूनच अजित पवारांनी साऊंड सिस्टिम लावणाऱ्या व्यक्तीला, “काय रे बाबा असं काय करतोय, तुला पैसे मिळाले नाही का?” असा प्रश्न विचारला. यावरूनच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
-
पुढे अजित पवार म्हणाले, “बाबा असं काही करू नको, मी तुला तुझ्या साऊंट सिस्टिमचे पैसे देतो, तुझी बील मी काढून देतो पण असं माईक वगैरे बंद करू नको.” पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे बहुमत आहे. तोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत. सत्तेच्या माध्यमातून आम्ही लोकांची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य