-
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकही झाली होती, असा दावा सध्या महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
-
या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
-
भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बाब खरी आहे, असे ते म्हणाले. एपीबी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
-
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत चर्चा झाली होती.” -
या बैठकीचा तपशील मी आता सांगणार नाही. मात्र, ही बैठक झाली, हे खरं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा आणि महायुतीला फसवलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवलं, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुसऱ्यांना महाविकास आघाडीलाही फसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.”
-
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली.
-
“भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता. त्यांनी विरोधातील १२ आमदारांना निलंबित केले. याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना तुरुंगात टाकण्याचा आणि भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होतं”, असे ते म्हणाले.
-
(सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरुन साभार.)
![US Illegal Immigrants](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/US-Illegal-Immigrants.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants: भारतीय नागरिकांना साखळदंड बांधून अमेरिकेतून पाठवलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?