-
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल ( बुधवारी) नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
-
या सभेपूर्वी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे तसेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्याचे समोर आले होते.
-
यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
-
रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
-
काय म्हणाले रोहित पवार?
“पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार आहेत म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस दिली जात आहे. काहींना तर अटकही करण्यात आली आहे.” -
“खरं तर निर्विवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
-
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी कांद्याची माळ घालून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करावे, असं आव्हानही दिले.
-
पुढे बोलताना, “राज्यातील नेते फुसका बार आहेत, तर पंतप्रधान मोदी यांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा आहे.”
-
“मात्र, महाराष्ट्रातील उध्वस्त झालेला शेतकरी बघून पंतप्रधान मोदी यांचा टेलीप्रॉम्प्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान पंतप्रधान मोदींची सभा पार पडली आणि कांदा प्रश्नावरुन या सभेत थोडा गोंधळ उडाल्याचेही पहायला मिळाले.
-
(सर्व फोटो रोहित पवार या फेसबुक पेजवरुन साभार.)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”