-
लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. {All Photos- Express photos by Ganesh Shirsekar)
-
महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसारखं मोठं आव्हान विधानसभेच्या निवडणुकीमध्येही देण्याच्या तयारीत आहे.
-
मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात महाविकास आघाडीत बऱ्याच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.
-
यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्येही याबाबत सूचक भाष्य केलं होतं.
-
यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल? याबाबत भाष्य केलं आहे.
-
महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असतील का? या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीचा फार्म्युलाच सांगितला आहे.
-
ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या कार्यक्रमात बोलत होते.
-
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील हे तुम्हाला मान्य आहे का? या प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो.” -
“जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतोत तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल.”
-
“मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!