-
राठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पार्टीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या बहिण-भावावर टीका केली आहे.
-
तसेच त्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की “मुंडे बंधू-भगिनींचे कार्यकर्ते मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.
-
दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांना माझ्याविरोधात समाज माध्यमांवर पोस्ट टाकायला सांगत आहेत.
-
“मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रभर फिरायचं आहे हे लक्षात ठेवा.” असं जरांगे म्हणाले.
-
बीडमधील नांदुर घाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमी ग्रामस्थांना बीडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज (१६ मे) रुग्णालयात जाऊन त्या जखमी तरुणांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
-
यावेळी ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा राजकारणी लोकांचे दगडाखालचे हात निघालेत तेव्हा तेव्हा त्यांनी समाजांवर अन्याय केला आहे. आता त्यांचे हात दगडाखालून निघालेत असं त्यांना वाटतंय. त्यामुळे ते मराठा समाजावर अन्याय करत आहेत.”
-
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजावर खूप आधीपासून अन्याय होत आला आहे. मराठा समाजाची मतं घ्यायची, त्यांच्या जीवावर मोठ व्हायचं आणि नंतर त्याच मराठा समाजाला संपवायचं हे धोरण या राजकारणांनी गेल्या अनेक वर्षांपासून राबवलं आहे. बीडमध्ये आमच्या बांधवांना मारहाण झाली आहे. मी या घटनेचा निषेध करतो.”
-
“मराठा समाजाचं पाठबळ घ्यायचं, या पाठबळावर निवडून यायचं आणि मग मराठा समाजाला संपवायचं हे त्यांचं धोरण आहे. आधी त्यांचा जीवावर मोठं व्हायचं आणि मग त्यांचा जीव घ्यायचा. मला या लोकांना सांगायचं आहे की, तुम्हाला आमचा जीव हवाच असेल तर आम्ही देखील जीव द्यायला तयार आहोत,कारण सध्या आमचाही नाईलाज आहे.”
-
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “मला त्या दोन्ही बहिण भावाला सांगायचं आहे, तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या, आम्ही देखील जीव द्यायला तयार आहोत. परंतु, आम्ही मागे हटणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही.”
-
“बीडमध्ये मराठा तरुणांना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी दखल घ्यावी त्या मुलांच्या अंगावर तलवारीचे वार करण्यात आले आहेत. त्यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ झाली आहे. मी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी.”
-
राजकारणी मंडळी याप्रकरणी काहीच करणार नाहीत. कारण त्यांच्यावरचं संकट दूर झालं की ते असेच वागतात. परंतु, आता मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. मराठा समाज आता एक झाला आहे. मला त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, बीडला येऊन दाखव, त्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की, तुमच्या नेत्यांनादेखील महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा. मी त्यांची गुंडगिरी सहन करणार नाही.” असं जरांगे पाटील म्हणाले.
-
(सर्व फोटो मनोज जरांगे पाटील या फेसबुक पेजवरून साभार.)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”