-
राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात ५ मतदारसंघात मतदान पार पडले. तर शेवटच्या टप्प्यात एकूण १३ मतदारसंघात मतदान झाले. महाराष्ट्रातील एकूण सर्व ४८ जागांवर मतदारसंघनिहाय किती टक्के मतदान झाले आहे, निवडणूक आयोगाने दिलेली मत टक्केवारीची अंतिम आकडेवारी काय?, हे आपण जाणून घेऊयात.
-
मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात ५१.८८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
-
मुंबई दक्षिण याठिकाणी ४७.७० टक्के मतदान झाले आहे.
-
मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात ५३.६७ टक्के मतदान झाले आहे.
-
मुंबई उत्तर पूर्व या मुंबईतीलच मतदारसंघात ५३.७५ टक्के मतदान पार पडले.
-
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये ५१.४२ मतटक्का समोर आला आहे.
-
मुंबई उत्तर या जागेवरून ५५.२१ टक्के नागरिकांनीच मतदान केल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.
-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हणजेच ठाणे मतदारसंघातील मतटक्केवारी ४९.८१ टक्के इतकी आहे.
-
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिंडोरी येथील प्रचारसभेत कांद्याच्या प्रश्नावरून गोंधळ उडाला होता. या मतदारसंघात ६२.६६ टक्के मतदान झाले आहे.
-
नाशिक मतदारसंघात ५७.१० टक्केवारीची नोंद झाली आहे.
-
पालघरमध्ये ६१.६५ टक्के मतदान झाले.
-
भिवंडीत ५६.४१ टक्के मतदान पार पडले आहे.
-
धुळे- ५६.६१ टक्के
-
बीडमध्ये ६९.७४ टक्के इतकं मतदान झालं.
-
शिर्डीत ६१.१३ टक्के.
-
अहमदनगर मतदारसंघामध्ये ६२.७६ टक्के मतदान झाले.
-
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे ६०.७३ टक्के मतदान झाले.
-
मावळ लोकसभा मतदारसंघात ५२.९० टक्के.
-
पुणे मतदासंघांत ५१.२५ टक्के मतदान झाले.
-
शिरूरमध्ये ५१.४६ टक्के मतदान पार पडले.
-
जालना मतदारसंघात ६८.३० टक्के.
-
रावेरमध्ये ६१.३६ टक्के मतदान झाले आहे.
-
जळगाव मतदारसंघात ५३.६५ टक्के मतदान झाले.
-
नंदुरबारमध्ये ६७.१२ टक्के मतदान झाले आहे.
-
सातारा मतदारसंघात ६३.०५ टक्के मतदान झाले आहे.
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये ५९.२३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
-
कोल्हापूर मतदारसंघात ७०.३५ टक्के मतदान पार पडले.
-
हातकणंगलेत ६८.०७ टक्के नागरिकांनी मतदान केले.
-
सांगलीमध्ये ६०.९५ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी आहे.
-
माढा या ठिकाणी ६२.१७ टक्के मतदान झाले आहे.
-
सोलापूर येथे ५७.६१ टक्के इतके मतदान झाले.
-
लातूर मतदारसंघात ६०.१८ टक्के मतदान झाले आहे.
-
तर परभणी मतदारसंघात ६२.२४ अशी मत टक्केवारी आहे.
-
रायगड मतदारसंघात एकूण ५८.१० टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी आहे.
-
बारामती येथे ५६.०७ टक्के. हा मतदारसंघ या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिला आहे.
-
धाराशिवमध्ये ६०.९१ टक्के इतके मतदान झाले आहे.
-
नांदेडमध्ये ६०.९४ टक्के.
-
हिंगोलीमध्ये ६३.५४ टक्के मतदान झालं.
-
यवतमाळ- वाशिम या जागेवर एकूण मतदान ६२.८७ टक्के झाल्याची अंतिम आकडेवारी आहे.
-
वर्धा मतदासंघांमध्ये ६४.८५ टक्के.
-
चंद्रपूर मतदारसंघात ६७.५५ टक्के मतदान झालं.
-
बुलढाणा मतदारसंघात ६२.०३ टक्के मतदान झालं.
-
अकोल्यात ६१.६९ मतदान झाले आहे.
-
अमरावतीमध्ये ६३.६७ टक्के मतदान झाले आहे.
-
गडचिरोली- चिमूरमध्ये ७१.८८ टक्के सर्वाधिक मतदान झाले.
-
भंडारा-गोंदिया मतदारसंघात ६७.०४ टक्के मतदान झाले.
-
विदर्भाच्या रामटेक मतदारसंघात ६१.०१ टक्के मतदान झाले.
-
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर मतदारसंघात ५४ टक्के मतदान झाले.
-
राज्यात सर्वात कमी टक्केवारी कल्याण या मतदारसंघातून पुढे आली आहे. याठिकाणी केवळ ४७.०८ टक्के लोकांनी मतदान केले आहे. (सर्व फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”